*माझ्या मामाचे पत्र मला सापडलेच नाही*
लहानपणी शाळेत असताना वर्गातील सर्व मुले मिळुन खेळ खेळत होतो .माझ्या मामाचे पत्र हरवले .बाकीचे मुले म्हणायचे तेच आम्हाला सापडले .
तो खेळ चालु असताना वर्गातील हुशार मुले एकमेकांच्या मागेच तो रुमाल टाकायचे .आणि खेळायचे डबल ,डबल एकमेकाच्या पाठिमागे टाकत असायचे .कधीही चुकुनही माझ्या पाठीमागे पडला नाही.माझ्या सारखे भरपुर होते .ज्याच्या पाठीमागे कधीच कुणी मामाचे पत्र टाकले नाही.
त्यामुळे माझ्या मामाचे पत्र मला सापडलेच नाही .
ईयत्ता ६ वीला गेल्यावर एक मित्र भेटला त्याचे नाव कुलदिप. आम्ही एकाच टेबलावर बसायचो.तो दुर गावावरून त्याच्या पाहुण्याकडे शिकायला आला होता. त्यामुळे मला त्याची खुप किव यायची . माझे तर आई वडिल भाऊ बहिण सर्व सोबत आहे. खुप दिवस माझी मैत्री त्याच्या सोबत टिकली. सोबत डब्बा खा . परिपाठात ही सोबत ,खेळायला ही सोबत.
पण एका दिवशी असे काही घडले सर्व काही बदलुन गेले. एका बेंच वर तिन जन बसत होतो. तर मी दुसऱ्या सोबत लपुन कामा निमित्त बोलत होतो . कारण मॉनिटर फळ्यावर नाव लिहित होता . तर माझ्या मित्राने माझ्या पाठीमागुन डोक्यावर हात वरती करून मॉनिटरला ईशारा केला की हे दोघे बोलत आहे .
माझे नशिब खुपच खराब आहे .नाते संबंधात प्रत्येक वेळेस साथ देतच नाही. त्याच वेळेस माझे लक्ष सहज मागे गेले तर मला त्याचा हात दिसला . आणि मॉनिटरने माझे नाव फळ्यावर लिहिले . थोड्या वेळाने सरांनी फळ्यावर नाव असलेल्या मुलाना उभे केले व शिक्षा केली . हातावर खुप जोरात छडी मारली. पण त्या छडी पेक्षा जास्त ईजा त्याचा हात बघितल्या वर झाली होती . नंतर मी त्याच्या सोबत बोल्लोच नाही . सातवीला गेल्यावर तो बोलण्याचा प्रयत्न करत होता पण मला त्याच्या सोबत बोलण्याची काही ईच्छाच झाली नाही. तो एकदा मला म्हटला सुध्दा मला साहवीला असणाऱ्या मित्रा सारखा मित्र हवा आहे . मी कदाचित हो ही म्हटलो असेल पण पुन्हा आमची तशी मैत्री कधीच झालीच नाही . व तो सातवी झाल्या नंतर त्याच्या गावाला केव्हा वापस गेला काही समजलेच नाही . आता मी त्याला फेसबुक वर शोधत आहे पण फेसबुक वर तो काही भेटत नाही आहे.
क्रमश:::::::
✍🏼✍🏼लेखक
विजय नामदेव त्रिभुवन
मुकूंदवाडी औरंगाबाद
मो नं. ८६०५८९५२४४